रत्नागिरी : जिल्ह्यात पावसाने पुन्हा एकदा जोर धरला असून, आज, १६ ऑगस्ट २०२५ रोजी जिल्ह्यात सरासरी १०४.३१ मिमी पावसाची नोंद झाली आहे. संपूर्ण जिल्ह्याचा एकूण पाऊस ९३८.८६ मिमी इतका होता.
चिपळूण तालुक्यात आज सर्वाधिक १८१.४४ मिमी पावसाची नोंद झाली आहे, तर त्याखालोखाल मंडणगड (१४२.५० मिमी) आणि दापोली (१३५.४२ मिमी) येथेही चांगला पाऊस झाला. गुहागर, खेड आणि संगमेश्वर तालुक्यांमध्येही पावसाचा जोर कायम होता.
याउलट, रत्नागिरी, लांजा आणि राजापूर या तालुक्यांमध्ये मात्र पावसाचे प्रमाण तुलनेने कमी होते. रत्नागिरीत ३८.०० मिमी, लांजात ४५.६० मिमी आणि राजापूरमध्ये ४८.७५ मिमी पावसाची नोंद झाली. जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले असून, नदी-नाल्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. हवामान विभागाने पुढील काही दिवस पाऊस सुरूच राहणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:59 AM 16/Aug/2025













