राजापूर : सापांबाबत समज-गैरसमज याबाबत मार्गदर्शन

राजापूर : श्रावण मासातील सणाच्या पार्श्वभूमीवर भगिनी मंडळ, राजापूर संचलित शिशु विहारमध्ये सापांची ओळख, सापांबद्दल समज-गैरसमज तसा सर्पदंश उपार पद्धती याबाबत मार्गदर्शन कार्यक्रम झाला. भारतीय परंपरा आणि त्या मागील शास्त्रीय कारणं यांची माहिती घेणं हे या कार्यक्रमाचं मुळ उद्दिष्ट होतं.

आपल्या मुलांना निसर्गाची ओळख करून देत असताना सृष्टीतील प्रत्येक जीव हा पर्यावरणाला पूरक आणि पोषक असतो याचं महत्व पटवून देण्यात आलं. यासाठी सर्पमित्र प्रकाश नाचणेकर आणि भूषण आरेकर यांनी सापांबाबत माहिती देताना सापांविषयी असणारे गैरसमज आणि भिती दूर केली. तसेच त्यांचा नैसर्गिक समतोल राखण्यासाठी होणारा उपयोग सांगितला. त्यावरती सर्पदंश झाल्यास करण्यात येणारे औषधोपचार या संबंधीची महत्वपूर्ण माहिती मंडळाच्या सभासद भूलतज्ञ डॉ. मंगला चव्हाण यांनी दिली. या कार्यक्रमात मुलांसोबत त्यांचे पालकही उपस्थित होते. तसेच भगिनी मंडळाच्या कार्यवाहिका डॉ. तृप्ती पाध्ये, उपकार्यवाहिका यशोधरा पाटणकर, सदस्या शुभांगी सोलगावकर, मंडळाच्या सभासद श्वेता भिडे, शिक्षिका अनन्या करंबेळकर, स्वरश्री ठाकुर-देसाई, मोहीते, होत्या. ओगले उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:26 AM 16/Aug/2025