‘स्वच्छ ग्राम’ साठी ग्रामस्थांनी पुढाकार घ्यावा : शौकत मुकादम

चिपळूण : राज्यात सर्व गावे निर्मल व स्वच्छ करायची असतील तर ग्रामपंचायतीच्या माध्यमातून ग्रामस्थांनी पुढाकार घेतला पाहिजे, असे प्रतिपादन माजी सभापती शौकत मुकादम यांनी केले. चिंचघरी ग्रामपंचायतच्या गावातील कचरा उचलण्याचा गाडीचे लोकार्पण करताना ते बोलत होते. डॉ. राकेश चाळके यांनी या योजनेची माहिती दिली. कार्यक्रमाला कळंबस्ते उपसरपंच गजानन महाडिक, राजाभाऊ चाळके, राजेश चाळके, डॉ. राकेश चाळके, आर्दीसह ग्रामस्थ उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:30 AM 16/Aug/2025