रत्नागिरी : शहरातील उद्यमनगर येथे तरुणाला इलेक्ट्रिक पंपाचा शॉक लागून मृत्यू झाला. ही घटना १७ ऑगस्ट रोजी दुपारी १ वा. सुमारास घडली. मिथून चंदू खेत्री (३४, रा. उद्यमनगर, रत्नागिरी) असे मृत तरुणाचे नाव आहे. तो भंगाराचा व्यवसाय करायचा. रविवारी दुपारी राहत्या घराजवळ इलेक्ट्रिक पंप पाण्यात टाकत असताना त्याला विजेचा जोरदार धक्का बसला.
ही बाब त्याच्या नातेवाईकांच्या लक्षात येताच त्यांनी त्याला तातडीने खासगी रुग्णालयात त्या नंतर अधिक उपचारांसाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मिथूनला तपासून मृत घोषित केले. या बाबत जिल्हा शासकीय रुग्णालयातील पोलिस चौकीत नोंद करण्यात आली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:07 AM 18/Aug/2025














