चिपळूण : वाशिष्ठी नदीवरील पुलावर खड्डेच खड्डे

चिपळूण : पेढांबे येथे वाशिष्ठी नदीवरील पुलाची दुरवस्था झाली आहे. हा पूल वाहून जाण्याची भीती आहे. स्थानिक लोकप्रतिनिधींपैकी कोणीही पुलाच्या दुरुस्तीची मागणी करत नाही. पुलाची दयनीय अवस्था सांगायची कोणाला, हा मोठा प्रश्न येथील नागरिकांना पडला आहे.

१९६४ ला उभारलेल्या या पुलावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून पेढांबे येथे वाशिष्ठी नदीवरील पुलाची डागडुजी झालेली नाही. पश्चिम महाराष्ट्राकडे जाणाऱ्या एसटीच्या फेऱ्या आणि खासगी वाहतुकीची वाहने या मार्गावरून जातात. पेढांबे, कोळकेवाडी, अलोरे, नागावे, भराडे, पोफळी, कुंभार्ली या गावाकडे जाण्यासाठी या पुलावरून जावे लागते. पेढांचे पिंपळी-शिरगाव
मार्गावर वाहतुकीला अडथळा निर्माण झाला तर याच पुलावरून वाहतूक शिरगावकडे वळवली जाते. पुलाचे पिलर धोकादायक झाले आहेत. अनेक वर्षांपासून त्यांचीही दुरुस्ती झालेली नाही. काही ठिकाणी पिलरला बारीक तडे गेले आहेत. हा पूल अरुंद असल्याने एकावेळी एकच वाहन पुलावरून मार्गस्थ होते

सार्वजनिक रायगड जिल्ह्यातील सावित्री नदीवरचा पूल वाहून गेल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाकडून या पुलाचे सर्वेक्षण करण्यात आले होते. त्याच वेळी हा पूल धोकादायक झाला असून, त्याची दुरुस्ती करणे किंवा नव्याने पूल बांधण्याची गरज आहे, असा अहवाल बांधकाम विभागाने वरिष्ठांना दिला होता. या पुलावरून हजारो प्रवासी दिवसाला वाहतूक करतात. त्यामुळे त्याची तातडीने दुरुस्ती होणे गरजेचे आहे-चंद्रकांत शिंदे, पेढांबे, ता. चिपळूण

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:21 PM 18/Aug/2025

Shanti 3