खेड : आवाशी शाळा, घरांमध्ये शिरले पाणी

खेड : खेड तालुक्यातील आवाशी गावात मुसळधार पावसामुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली असून गावातील अनेक वाड्यांचा संपर्क तुटला आहे. मुंबई-गोवा महामार्गावरील चुकीच्या कामामुळे पाणी थेट गावात शिरल्याने परिस्थिती अधिक गंभीर झाली आहे. लोटे एमआयडीसी परिसरातील काही रासायनिक कंपन्यांच्या संरक्षण भिंतींमुळे पाण्याचा नैसर्गिक प्रवाह अडवला गेला असून त्याचा फटका आवाशी गावाला बसला आहे. त्यामुळे गावात मोठ्या प्रमाणावर पाणी साचले आहे.

जिल्हा परिषद शाळा पूर्णपणे पाण्याखाली गेली आहे. शाळेत असलेले शिक्षक पाण्याच्या विळख्यात अडकले आहेत. गावातील अनेक घरांत व अंगणात पाणी शिरल्याने नागरिकांच्या हालअपेष्टा वाढल्या असून शेतजमिनी पाण्याखाली गेल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. प्रशासनाकडून मदतकार्य सुरू करण्यात आले असले तरी नागरिकांचा संताप वाढलेला दिसून येत आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:34 AM 19/Aug/2025