कोल्हापूर-रत्नागिरी रोडवर वाहतूक कोंडी

कोल्हापूर : पश्चिम महाराष्ट्र-कोकणाला जोडणाऱ्या सह्याद्री घाटातील कोल्हापूर-रत्नागिरी रोडवर अतिवृष्टीमुळे रस्त्याकडेला असणाऱ्या डोंगरावरून चिखल खाली आला. त्यामुळे या मार्गावर एकेरी वाहतूक सुरू झाली आहे.

यामुळे वाहतूकीची कोंडी झाली आहे.

मुसळधार पावसामुळे मातीचा मलबा अजून खाली येण्याची शक्यता आहे. रस्त्यावर आलेल्या दगड, माती, चिखलाचे ढिगारे जेसीबी, डोझर, डंपरच्या सहाय्याने काढण्याचे काम सुरु आहे. कोकण, कोल्हापूर परिसरात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असून हवामान खात्याने अलर्ट जारी केला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:03 19-08-2025

Shanti2