Breaking : Maharashtra Cabinet Decision | आजचे राज्य मंत्रिमंडळाचे महत्त्वाचे निर्णय

मुंबई : राज्याच्या मंत्रिमंडळात काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी त्याची घोषणा केली. त्यामध्ये मुंबईतील टाटा मेमोरिअल सेंटरमध्ये 100 खाटांचे रुग्णालय उभारण्यासाठी मुंद्रांक शुल्क माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

तसेच राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातील गट-क (तांत्रिक) संवर्गातील विविध पदावर 29 दिवस तत्त्वावर कार्यरत 17 कर्मचाऱ्यांची तात्पुरती सेवा नियमित करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

मुंबईसह राज्यभरात पावसाचा जोर वाढला असून त्याचा आढावा राज्याच्या मंत्रिमंडळात घेण्यात आला आहे. मुंबईसह सर्वच जिल्ह्यातील ठिकाणच्या आपत्ती व्यवस्थापन केंद्रांना आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिले आहेत.

मंत्रिमंडळातील महत्त्वाचे निर्णय

Shree clinic

मुंबईतील टाटा मेमोरिअल सेंटरच्या एकात्मिक आयुर्वेदिक कर्करोग दवाखाना आणि संशोधन केंद्रात 100 खाटांचे रुग्णालय उभारण्यासाठी मुद्रांक शुल्क माफ.

कोल्हापुरातील सावित्रीबाई फुले महिला सहकारी औद्योगिक वसाहत लिमीटेड, संस्थेस कसबा करवीर, बी वॉर्ड, कोल्हापूर येथील गट क्र.६९७/३/६ मधील २ हे. ५० आर जमीन देणार. (महसूल, नोंदणी व मुद्रांक शुल्क विभाग)

सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील मौजे वेंगुर्ला – कॅम्प गवळीवाडा येथील शासकीय जमिनीवरील अतिक्रमण नियमानुकूल करण्यास मान्यता. (महसूल, नोंदणी व मुद्रांक शुल्क विभाग)

राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील गट-क (तांत्रिक) संवर्गातील विविध पदावर २९ दिवस तत्त्वावर कार्यरत १७ कर्मचाऱ्यांची तात्पुरती सेवा नियमित करण्यास मान्यता. (वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग)

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:56 19-08-2025