गणेशोत्सवासाठी रेल्वेच्या ३६७ जादा फेऱ्यांचे नियोजन

मुंबई : गणेशोत्सवासाठी कोकणासह राज्यातील प्रवाशांसाठी रेल्वेने जादा गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. यंदा भारतीय रेल्वेने दरवर्षी पेक्षा ३६७जादा फेऱ्यांसाठी रेल्वेगाड्या सोडण्याची नियोजन केल्याची माहिती केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी दिली.

याबद्दल राज्यातील तमाम गणेशभक्तांच्या वतीने फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचे आभार मानले आहे. आगामी गणेशोत्सवासाठी राज्य शासनाने रेल्वेमंत्र्यांकडे जादा गाड्या सोडण्याची मागणी केली होती.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:45 PM 20/Aug/2025

Shanti real estate 1