देवरुख : गेली दोन दिवस पडत असलेल्या संगमेश्वर मुसळधार पावसामुळे तालुक्यातील दोन घरांचे छप्पर कोसळून व एका घराचा बांध पडून २ लाख ७६ हजार ७० रुपयांचे नुकसान झाल्याची नोंद झाली आहे
मौज विघ्रवली खालचीवाडी येथील रमेश राजाराम कदम यांच्या घरावर आंब्याचे झाड पडून २ लाख ५७ हजार ७७० रु. इतके नुकसान झाले आहे. याचबरोबर हरपूडे येथे प्रेमलता प्रभाकर कांबळे यांचे घराची पडवी कोसळून ८ हजार ३०० रु.चे नुकसान झाले आहे. तालुक्यातील मौजे मांजरे (बौद्धवाडी) येथील धार्मिक बारका जाधव यांच्या घरासमोरील कच्चा बांध अतिवृष्टीमुळे कोसळून सुमारे १० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. त्यांच्या घरासमोरील विजेचा खांब देखील कोसळण्याच्या स्थितीत असल्याचे त्यांनी नोंदवले आहे. तालुक्यात सोमवारी १५६ मिलिमीटर पाऊस कोसळला आहे. मंगळवारी ७२ मिमी पाऊस पडला असून एकूण पावसाची नोंद २ हजार ६६९ मि. मी. इतकी झाली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
09:57 AM 21/Aug/2025













