राज्यस्तरीय लोकशाहीर अण्णा भाऊ साठे युवा साहित्यरत्न पुरस्कार अरुण मोर्ये यांना जाहीर

गणपतीपुळे : रत्नागिरी तालुक्यातील सत्कोंडीसारख्या ग्रामीण भागातील युवा साहित्यिक अरुण मोर्ये यांना ए.डी. फाऊंडेशन महाराष्ट्र यांचा यावर्षीचा लोकशाहीर अण्णा भाऊ साठे साहित्यरत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

कोकण मराठी साहित्य परिषदेच्या माध्यमातून युवापिढीला साहित्याकडे वळविण्यासाठी व नवसाहित्यिक कोमसापच्या घडविण्यासाठी युवाशक्तीमार्फत विविध साहित्यिक उपक्रम राबवून मोलाचे योगदान देणारे अरुण मोर्ये हे कोमसाप युवाशक्तीचे दक्षिण कोकण विभाग (रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग) युवाशक्तीचे प्रमुख म्हणून कार्यरत आहेत.

मोर्ये यांनी केलेल्या विपुल लिखाणापैकी कविता संग्रह, कथासंग्रह व नाटके प्रकाशनाच्या मार्गावर आहेत. सोशल मीडियावर व मासिकांतून त्यांचे अनेक लेख, कविता सातत्याने प्रकाशित होत असतात. या आधी कवी नारायण सुर्वे साहित्य कला अकादमी पुणे यांच्या कवी केशवसुतांचे वारसदार कवी या पुरस्काराने ही अरुण मोर्ये यांना सन्मानित करण्यात आले आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:34 AM 21/Aug/2025

Tata sierra