चिपळूण : तळवडेत संत ज्ञानेश्वर माऊली दिंडी

चिपळूण : तालुक्यातील तळवडे येथे संत श्री ज्ञानेश्वर माऊली यांच्या ७५० व्या जयंतीनिमित्त गावामध्ये श्री संत ज्ञानेश्वर माऊली पालखी दिंडी काढण्यात आली. त्यात विद्यार्थी, शासकीय कर्मचारी, शिक्षक, अंगणवाडी सेविका सहभागी झाले होते.

हर घर तिरंगा अभियानांतर्गत विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन केले होते. यावेळी तळवडे गावच्या सरपंच दूर्वा विचारे, उपसरपंच ज्योती कदम, ग्रामपंचायत अधिकारी पूजा गरगटे, सुशांत साळवी, विद्या घोसाळकर, मयूरी चव्हाण, ग्रामस्थ चंद्रकांत कदम, कांता कदम, सांची कदम, गौतम कदम, सुधाकर लाड, ऋषिकेश विचारे, संतोष विचारे, अरुण मोहिते, उदय पाटकर आदी उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:25 AM 21/Aug/2025

Amey jwelrs