मुंबई-गोवा महामार्ग खड्ड्यातच..!

मुंबई : गणेशोत्सव अवघ्या चार दिवसांवर येऊन ठेपला असला तरी मुंबई-गोवा महामार्ग ठिकठिकाणी खड्ड्यांतच आहे. प्रशासनाने रस्त्याच्या डागडुजीकडे कानाडोळा केला असून, हा महामार्ग वेळेत दुरुस्त झाला नाही तर गणेशोत्सवाला चाकरमानी वेळेत पोहोचतील की नाही? हा प्रश्न अनुरितच आहे. दरम्यान, गणेशोत्सावासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमानी मोठ्या संख्येने शनिवारी रात्रीच गावाकडे निघणार आहेत.

मुंबई-गोवा महामार्ग जनआक्रोश समितीने सांगितले की, कित्येक वर्षांपासून मुंबई-गोवा महामार्गाच्या दुरवस्थेबाबत सरकारला जाब विचारत आहोत. मात्र, रस्ता आहे, तसा आहे. प्रत्येक वर्षीच्या गणेशोत्सवात खड्ड्यांचे ‘विघ्न’ पार करत गणेशभक्तांना कोकणातील आपले गाव गाठावे लागते. यंदा अवघे चार ते पाच दिवस गणेशोत्सवासाठी शिल्लक आहेत. मात्र, रस्त्याची डागडुजी झालेली नाही. कशेडी बोगद्याच्या अगोदर रस्त्याच्या झालेल्या दुरवस्थेमुळे चाकरमानी कोकणात पोहोचेल की नाही? हा प्रश्न आहे. गडब येथेही हीच अवस्था आहे. बहुतांशी चाकरमानी शनिवारी रात्री कोकणात जाण्यासाठी निघणार आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:04 23-08-2025

Shanti real estate 1