खेड : मुंबई विद्यापीठाचा ५८वा युवामहोत्सव नुकताच ज्ञानदीप महाविद्यालय बोरवंडे येथे नुकताच झाला. या युवा महोत्सवामध्ये विविध २० महाविद्यालयांतील जवळपास ५०० पेक्षा अधिक विद्यार्थी ४३ प्रकारच्या विविध स्पर्धांमध्ये सहभागी झाले होते.
घरडा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धामध्ये आपला सहभाग नोंदवून ६ पारितोषिके प्राप्त केली. रांगोळी वैयक्तिक यामध्ये वैष्णवी शिर्के हिला द्वितीय पारीतोषिक प्राप्त झाले. शास्त्रीय वाद्य (स्वरवाद्य) वैयक्तिक या प्रकारामध्ये श्रावणी सकपाळ या विद्यार्थिनीला प्रथम पारितोषिक मिळाले तर गंधर संकपाळ यांनी तृतीय पारितोषिक पटकाविले. वक्तृत्व स्पर्धा (इंग्रजी) गट व मधून सलोनी म्हाडलेकर हीला उत्तेजनार्थ पारितोषिक प्राप्त झाले आहे.
भारतीय शास्त्रीय नृत्य या प्रकारामध्ये मनस्वी शिरकर हिने द्वितीय पारितोषिक संपादन केले तर भारतीय लोकनृत्य या प्रकारामध्ये पारंपरिक गुजराती गरबा या नृत्य प्रकाराला द्वितीय पारितोषिक मिळाले. या सांघिक प्रकारामध्ये सई दळवी, सुहानी इंदुलकर, श्रुती शिर्के, निकीता नारखेडे, रुतीका पाटील, सिद्धी राजेशिर्के, मनस्वी शिरकर, श्रुतिका सावंत, वैष्णवी उगवे, रिद्धी जोशी, तर साथीदार म्हणून सोहन चव्हाण व श्रावणी संकपाळ यांचा सहभाग होता.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:17 AM 26/Aug/2025














