कुंभार समाजाला मूळ प्रवाहात आणणार : मिलिंद इवलेकर

दापोली : कुंभार समाजाला मूळ प्रवाहात आणण्यासाठी माझे आयुष्य वेचेन, असे प्रतिपादन खेड येथील उद्योजक मिलिंद इवलेकर यांनी केले. दापोली तालुक्यातील कुंभार समाजाच्यावतीने जालगाव ग्रामपंचायतीच्या सभागृहात आयोजित विद्यार्थी गुणगौरव कार्यक्रमात बोलत होते. या कार्यक्रमासाठी विद्यार्थी, पालक आणि सभासद उपस्थित होते. या वेळी दहावी, बारावी आणि उच्चशिक्षित विद्यार्थी तसेच इतर विविध विभागात प्रावीण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांना गौरवण्यात आले.

दापोली तालुक्यात विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये तसेच अडचणीच्यावेळी दापोलीत थांबता यावे व अभ्यास करता यावा तसेच समाजाने वेगवेगळे कार्यक्रम राबवावेत यासाठी सभागृहाची निर्मिती करण्यासाठी दापोली तालुक्यातील भोंजाळी येथे सहा गुंठे जागा घेण्यात आली आहे. तेथे सुसज्ज हॉल व काही खोल्यांची निर्मिती होईल, अशी व्यवस्था समाजाकडून करण्यात आली आहे. श्री संत गोरा कुंभार हितवर्धक मंडळ दापोली या नावाने मंडळाची नोंदणी असून, वर्षभरात सर्वसामान्यांची आर्थिक अडचण दूर करण्यासाठी पतसंस्थेची स्थापना करणार असे इवलेकर यांनी सांगितले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:10 PM 26/Aug/2025