पावस : रत्नागिरी तालुक्यातील शिवार आंबेरे येथील लोकनेते शामराव पेजे महाविद्यालयाच्या एनएसएस विभागाच्या स्वयंसेवक आणि लोकसहभागातून शिवार आंबेरे, जाकादेवी परिसरात १०० वृक्षांची लागवड करण्यात आली.
फिनोलेक्स इंडस्ट्रीजने यासाठी वृक्ष देऊन मदत केली. फिनोलेक्स इंडस्ट्रीज व राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम झाला. प्राचार्य मधुकर थुळ यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले. राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या कार्यक्रमाधिकारी कल्पना मेस्त्री, प्रा. अमित पवार, सायन्स विभागप्रमुख प्रा. ओंकार लिंगायत, नेचर क्लब विभागप्रमुख प्राध्यापिका अनुष्का लिंगायत यांनी कार्यक्रमासाठी योगदान दिले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:50 PM 26/Aug/2025














