Chiplun : शिरगाव येथे मृतावस्थेत आढळला बिबट्याचा बछडा

चिपळूण : चिपळूण तालुक्यातील शिरगाव येथे आज सकाळी बिबट्याचा बछडा मृत अवस्थेत आढळला. ही घटना अमोल साळुंखे यांच्या घराच्या कंपाउंडमध्ये घडली असून त्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

साळुंखे यांनी तत्काळ शिरगाव पोलिस ठाणे व वन विभागाला याची माहिती दिली.

त्यानुसार चिपळूण वन विभागाच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन मृत बिबट्याला ताब्यात घेतले.

प्राथमिक तपासात मोठा बिबट्या आणि बछड्यात झालेल्या भांडणात बछड्याच्या मानेला झालेल्या दुखापतीमुळे मृत्यू झाला असावा, असा अंदाज वन विभागाने व्यक्त केला आहे. मृत बिबट्या नर जातीचा असून त्याला चिपळूण येथे नेण्यात आले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:00 26-08-2025