रत्नागिरी : गणेशोत्सवाच्या स्वागतासाठी सारे सज्ज झाले असून, बुधवारी (ता. २७) साऱ्यांच्या घरी लाडक्या बाप्पांचे आगमन होणार आहे. या वर्षी जिल्ह्यात गणेश चतुर्थीला घरगुती १ लाख ६९ हजार ४२६ गणपती मूर्तीची, तर सार्वजनिक १२६ गणपती मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे.
गतवर्षी २०२४ पेक्षा यावर्षी घरगुती गणपतींमध्ये तब्बल २ हजार ५५९ गणेशमुर्तीची वाढ झाली आहे, तर सार्वजनिक गणपतींमध्ये ४ गणेशमूर्तीची वाढ करण्यात आली आहे
या वर्षीच्या आकडेवारीनुसार जिल्ह्यातील पोलिस ठाणेनिहाय रत्नागिरी शहर ७९१३ घरगुती तर सार्वजनिक २७, रत्नागिरी ग्रामीण १३०६५ घरगुती तर सार्वजनिक ०, जयगड घरगुती ३४५० तर घरगुती ५, संगमेश्वर १३५४४ घरगुती, तर सार्वजनिक २, राजापूर २००९२ घरगुती, तर सार्वजनिक ७, नाटे ७०७८ घरगुती तर सार्वजनिक ४, लांजा १६१३१ घरगुती तर सार्वजनिक ६, देवरूख १२४९३ घरगुती तर सार्वजनिक ७, सावर्डे १२०२२ घरगुती तर सार्वजनिक १, चिपळूण १६७२५ घरगुती तर सार्वजनिक १६, गुहागर १४४६० तर सार्वजनिक २, अलोरे ४५६१ घरगुती तर सार्वजनिक ४, खेड १२७०० घरगुती तर सार्वजनिक २१, दापोलि ६३३५ घरगुती तर सार्वजनिक ९, मंडणगड २९५५ घरगुती तर सार्वजनिक १०, बाणकोट ६८२ घरगुती तर सार्वजनिक २, पूर्णगड ३७२१ घरगुती तर सार्वजनिक १ आणि दाभोळ १४९९ घरगुती तर सार्वजनिक १ अशा घरगुती आणि सार्वजनिक मिळून एकूण १ लाख ६९ हजार ५५२ गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना होणार आहे.
भाद्रपद शुद्ध चतुर्थीला गणपती बाप्पाच्या मूर्तीची पूजा करण्याची प्राचीन परंपरा आपल्याकडे आहे. महाराष्ट्रात गणेशोत्सवाला अनन्य साधारण महत्त्व आहे. अन्य देशांतही मोठ्या प्रमाणात गणेशोत्सव साजरा केला जातो. यंदाचा गणेशोत्सव २७ ऑगस्ट रोजी सुरू होऊन, ६ सप्टेंबर अनंत चतुर्दशीला समारोप होणार आहे.
आगामी गणेशोत्सव सणासाठी १८ पोलिस ठाण्यात बैठका घेऊन कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून खबरदारी घेतली आहे. मुंबई – गोवा महामार्गावरून येणाऱ्या गणेश भक्तांना कोणताही त्रास होऊ नये यासाठीही सर्व संबंधित विभागाची बैठक घेतली आहे. तसेच सर्व ठिकाणी योग्य तो पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. – अश्वनाथ खेडकर, पोलिस निरीक्षक, जिल्हा विशेष शाखा
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:19 26-08-2025














