राजापूर : तालुक्यात गणेश चतुर्थी दिवशी सुमारे २७ हजार घरगुती गणपतींसह सार्वजनिक गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना होणार आहे. गणेशोत्सवाच्या आगमनामुळे बाजारपेठेला चांगलीच संजीवनी मिळाली आहे. बाप्पांच्या स्वागताच्या तयारीसाठी गणेशभक्तांची धावपळ उडाली आहे.
तालुक्यातील सार्वजनिक मंडळांमध्ये शहरातील भटाळी, धर्मशाळा येथील सार्वजनिक गणेशात्सव मंडळ, महाराष्ट्र वीज वितरण कर्मचाऱ्यांचे गणेशोत्सव मंडळ, एस्टी. आगारातील चालक वाहकांचा गणेशोत्सव, ओणी, दसूर, ओझर आणि आडीवरे, जैतापूर येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचा समावेश होतो. या मंडळांच्या वतीने गणेशोत्सवाची जोरदार तयारी केली जात आहे. विविध वस्तूंच्या वाढलेल्या दरामुळे गणेशोत्सवावर सध्या महागाईचे संकट दाटले आहे. गणेशोत्सवासाठी दरवर्षी मोठ्या संख्येने मुंबईकर चाकरमानी कोकणात दाखल होत असून, यावर्षीही मोठ्यासंख्येने चाकरमानी दाखल होत आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:56 AM 28-Aug-25














