राज्यस्तरीय नाट्य परिषद स्पर्धेमध्ये कॉफीन एकांकिकेचा अंतिम फेरीत प्रवेश

xr:d:DAF1aTVbgkI:8,j:5823564894037640794,t:23112802

रत्नागिरी : अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या राज्यस्तरीय नाट्य परिषद एकांकिका करंडक स्पर्धेमध्ये महाराजा फाउंडेशन पुरस्कृत चिन्मय सरपोतदार लिखित कॉफीन एकांकिकेला अंतिम फेरीमध्ये प्रवेश मिळाला आहे.

वेदांग सौंदलेकर दिग्दर्शित कॉफीन एकांकिकेमध्ये सर्वसामान्यांच्या घरांमध्ये आपल्या मुलाच्या शिक्षणाबद्दल आणि नोकरीबद्दल अवास्तव अशा अपेक्षा असतात आणि त्यातूनच फॉरेनला जाण्यासाठी जणू काही स्पर्धाच लागली आहे, असे आपल्याला दिसून येते. अशा वेळेला त्या मुलाला जिवंतपणीच मृतावस्थेसारखे जगावे लागते. कॉफीन म्हणजे शवपेटी अशा प्रतिकात्मक आशयाची एकांकिका लोकगीताच्या माध्यमातून सादरीकरण झाली आहे. १६ ते १७ कलाकारांनी रंगमंचावर दर्जेदार आणि लोकांच्या मनामध्ये मुलांच्या भवितव्याबद्दल वास्तववादी अंजन घालणारी एकांकिका सादर केली. अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या रत्नागिरी शाखेचे कार्यवाहक समीर इंदुलकर, समन्वयक आनंद आंबेकर, सुनील बेंडखळे आणि सदस्य यांच्या सहकार्यातून रत्नागिरी केंद्रावर एकूण नऊ एकांकिका रजिस्टर झाल्या. त्यातील आठ एकांकिकेचे सादरीकरण झाले. यामध्ये कॉफीनला अंतिम फेरीमध्ये प्रवेश मिळाला.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
*शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:31 AM 28-Aug-25