सावर्डे : ज्येष्ठागौरींना आवाहनची थोडी वेगळी अनोखी परंपरा जपत चिपळूण तालुक्यातील डेरवण येथे राहणाऱ्या गिरीश दत्तात्रय गुरप यांच्या घरी गणपतीच्या दोन्ही बाजूला गौराईची स्थापना करण्यात आलो. गिरीश यांचे आजोबा जनार्दन गुरप यांनी ८६ वर्षांपूर्वी ही प्रथा परंपरा सुरू केली. त्याचे आजही पालन केले जाते.
मूळच्या अहमदनगर येथील असलेल्या गुरप कुटुंबियांनच्या दुसऱ्या पिढीने या गौराई पूजनाची प्रथा-परंपरा सुरू केली. ती प्रथा गुरप कुटुंबीयांची आजची पाचवी पिढी देखील उत्साहाने जपते आहे. मूळचे अहमदनगर येथील असलेले हे कुटुंबीय नोकरीच्या निमित्ताने आधी पुणे आणि नंतर डेरवण या ठिकाणी स्थायिक झाले आहे. या कुटुंबातील जनार्दन गुरप हे सरकारी दफ्तरी नोकरीत होते.
परतू काही गोष्टी मनासारख्या घडेना म्हणून ते गणेशाची आराधना करीत. त्यांची बालपणापासूनच गणपती या दैवतावर अपार श्रद्धा होती. त्यामुळे ते गणेशाच्या पायी सदैव लीन असत. एके दिवशी गौराईने त्यांना स्वप्नात दृष्टांत दिला की, दरवर्षी गणेशोत्सवामध्ये माझी गणेशाच्या दोन्ही बाजूला स्थापना करून पूजा कर सारे काही ठीक होईल, त्या दृष्टांताप्रमाणे माझ्या आजोबांनी ८६ वर्षापूर्वी अहमदनगर येथील आमच्या मूळ घरामध्ये गणपतीच्या दोन्ही बाजूला गौराईची स्थापना करून पूजा सुरू केली. ही परंपरा आजही आम्ही जपली आहे अशी माहिती जनार्दनरावांचे नातू गिरीश गुरप यांनी ‘सकाळ’शी बोलताना दिली. कोकणात मुखवट्याच्या रूपात, उभ्या पाटावर ठेवून, फोटोच्या रूपात, तेरड्याच्या फुलासहित रोपाच्या रूपांत तर काही ठिकाणी खड्यांच्या रूपात गौरी पुजल्या जातात. कोकणात बहुतांश ठिकाणी एकच गौराई आणली जाते.
गौराईपूजनाची परंपरा आज आम्ही पाचव्या पिढीतही सुरूच ठेवली आहे. आम्ही नोकरीच्या निमित्ताने डेरवण येथे राहतो, परंतु गणेशोत्सवासाठी आम्ही मूळ गावी न जाता आम्ही याच ठिकाणी गणपतीचे गौराईचे पूजन करतो. गौराईपूजनाच्या दिवशी आमच्याकडे ब्राह्मण जेवण, सुवासिनींचे पूजन असे कार्यक्रम पार पडतात.-अर्चना गुरप
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
*शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
4:18 PM 01-Sep-2025














