रत्नागिरी : गणेश विसर्जनाची धामधूम सुरू असतानाच जिल्ह्यात मंगळवारी दिवसभर पावसाने धुमाकूळ घातला होता; मात्र बुधवारी (ता. ३) पावसाचा जोर ओसरला होता. अधूनमधून एखादी सर पडून जात होतो. त्यामुळे गणरायाच्या विसर्जन मिरवणुकांमध्ये उत्साहाचे वातावरण होते, पण पाऊस केव्हाही सुरू होण्याची लक्षणे असल्याने गणेशभक्तांना थोडी कसरत करावी लागली
जिल्ह्यात बुधवारी सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या चोवीस तासांत जिल्ह्यात सरासरी ३३.५९ मिलिमीटर पाऊस झाला. त्यात मंडणगड ११.५० मि.मी., खेड २०.५७, दापोली १५.१४, चिपळूण २०.८९, गुहागर १८.२०, संगमेश्वर ८६.९१, रानागिरी ५२.४४, लांजा ६२.४०, राजापूर १३.६२ मि.मी. पाऊस झाला. मंगळवारी रात्रभर जिल्ह्यात जोरदार रत्नागिरीलुक्यातील सोमेश्वर येथील भातशेती कापणीयोग्य झाली आहे.
पडलेल्या पावसामुळे नद्या, नाले दुथडी भरून वाहत होते. विसर्जन करतानाही गणेशभक्तांना काळजी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. समुद्रही खवळलेला होता. बुधवारी पावसाने विश्रांती घेतल्यानंतर जगबुडी, वाशिष्ठी, बावनदी, काजळी या नद्यांचे पाणी ओसरले होते; मात्र वेगवान वाऱ्यांमुळे समुद्र खवळलेला आहे. त्याचा फटका मासेमारीला बसला आहे. काही मोजक्याच नौका मासेमारीसाठी समुद्रात रवाना झाल्या आहेत. त्यांनाही अपेक्षित मासळी मिळत नसल्याने रिकाम्या हाती माघारी परतावे लागले. गिलनेटद्वारे मासेमारी करणाऱ्यांची पंचाईत झाली असून, त्यांना नौका बंदरात उभ्या करून ठेवाव्या लागलेल्या आहेत.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील दोन दिवस हलका पाऊस पडणार आहे. हळवं पीक तयार जून महिन्याच्या सुरुवातीला भातपेरणी केलेल्या क्षेत्रातील पीक कापणीसाठी तयार झालेले आहे. रत्नागिरी तालुक्यातील सोमेश्वर पट्यात काजळी नदीच्या किनाऱ्यापासून काही अंतरावर असलेली भातशेती कापणीयोग्य झालेली आहे. सध्या पाऊल सुरू असल्यामुळे त्यांनी भातकापणी लांबणीवर टाकली आहे.
पाऊस थांबण्याची प्रतीक्षा शेतकऱ्यांना आहे. यंदा मे महिन्याच्या मध्यात मुसळधार पाऊस झालेला होता. त्यानंतर पावसाने विश्रांती घेतली: परंतु, नदीकिनारी शेतीक्षेत्र असल्याने पाण्याची कमतरता जाणवली नाही. त्यामुळे जूनच्या पहिल्या आठवड्यात पेरणी करून घेतली. त्यानंतर २१ दिवसांनी भातलावणी केली. पुढे १७दिवसात योग्य व्यवस्थापन केल्यामुळे भातरोपांच्या लोंब्या कापणीसाठी तयार आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
09:11 04-09-2025












