खेड : मुंबई-गोवा महामार्गावर खवटीनाका येथे रिक्षा व मोटारीमध्ये झालेल्या भीषण अपघातात एक जण गंभीर जखमी झाला. अनिल दाजी भोसले (वय ४६, रा. विक्रोळी, मुंबई, मूळ रा. खोपी शिरगाव, ता. खेड) हे रिक्षाने गावी येत होते. सकाळी ११ वाजता खवटीनाका येथे आले असता पाठीमागून वेगात आलेल्या मोटारीने रिक्षाला जोरदार धडक दिली.
धडकेत रिक्षा रस्त्यावर उलटली असून, भोसले व त्यांचे मित्र किरण आंबेकर दोघेही रस्त्यावर फेकले गेले. या अपघातात भोसले यांचा डावा हात फॅक्चर झाला असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मोटारचालक नरेंद्र रमेश ओतारी (रा. पुणे) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:27 04-09-2025














