खेड : तालुक्यातील कुरवळ गावात कौटुंबिक वादातून महिलेला मारहाण, शिवीगाळ व धमकी दिल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी रसिका समीप हुंबरे यांनी खेड पोलिसात फिर्याद दाखल केली असून, पाच जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
१ सप्टेंबरला सायंकाळी फिर्यादी व त्यांचे पती, सासू तसेच नातेवाईक देवदर्शन करून कुरवळ येथील घरी परतले. त्यावेळी दीर अमोल हुंबरे, जाऊ आदिती हुंबरे, आदितीचे काका दीपक सखाराम उत्तेकर, मामा संदेश विचारे आणि भाऊ साई पांडुरंग उत्तेकर यांनी जमाव करून फिर्यादीच्या घरात प्रवेश केला. संशयितांनी फिर्यादीचे पती समीप हुंबरे यांना मारहाण केल्याचे फिर्यादीने पोलिसांना सांगितले. या मारहाणीमध्ये फिर्यादी, त्यांचे पती, सासू व इतर कुटुंबीय जखमी झाले असून, खेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अधिक तपास खेड पोलिस करत आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:27 04-09-2025












