संगमेश्वर : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील रखडलेले सोनवी पुलाचे काम आता संगमेश्वर देवरुख मार्गालाही अडथळा ठरत आहे. गणेशोत्सवानंतर परतीच्या प्रवासाला निघालेल्या कोकणवासियांना प्रचंड वाहतूककोंडीचा सामना करावा लागत आहे. बुधवारी (ता. ३) सकाळपासूनच संगमेश्वर ते नवनिर्माण महाविद्यालयादरम्यान वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळाल्या.
अनेक प्रवासी अर्धा ते एक तास या कोंडीत अडकले होते.
सोनवी पुलाचे काम अनेक महिन्यांपासून रखडले असून, पर्यायी मार्गाच्या अपुन्या नियोजनामुळे आणि वाढलेल्या वाहतुकीमुळे संगमेश्वर देवरूख मार्गावरील वाहतुकीवरही परिणाम झाला आहे. स्थानिक प्रशासन आणि कहतूक विभागाने तत्काळ उपाययोजना करून मार्ग मोकळा करण्याची मागणी नागरिक आणि प्रवाशांकडून करण्यात येत आहे.
संगमेश्वर सोनची चौक येथे पोलिस तसेच वाहतूक पोलिस तैनात होते; मात्र सोनवी पूल ते गणेशकृपा हार्डवेअरपर्यंत एकेरी मार्ग असल्यामुळे पोलिसांनाही वाहतूक सुरळीत करताना मनस्ताप सहन करावा लागला. बुधवारी सकाळी १० वाजल्यापासून संगमेश्वर देवरूख मार्गावर मुंबईकडे परतणारी अनेक वाहने आल्यामुळे संगमेश्वर सोनवी चौक येथील वाहतूककोंडीचा फटका या वाहनांना बसला. सोनवी चौक ते नवनिर्माण महाविद्यालय लोवले अशी दोन किमी वाहनांची रांग लागली होती.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:27 04-09-2025












