Police Sub Inspector : पोलिस उपनिरीक्षक पदांसाठी खात्यांतर्गत परीक्षा पुन्हा सुरू

मुंबई : गेल्या तीन वर्षांपासून बंद केलेली पोलिस उपनिरीक्षक पदांसाठी खात्यांतर्गत परीक्षा पुन्हा सुरू करण्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परवानगी दिली आहे. या परीक्षेमुळे एकूण रिक्त पदांच्या खात्यांतर्गत २५ टक्के पदे भरण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

किमान पाच वर्षांची सेवा पूर्ण केलेल्या पोलिस अंमलदारांना उपनिरीक्षक पदासाठी खात्यांतर्गत २५ टक्के आरक्षणाच्या माध्यमातून परीक्षा देता येत होती. या माध्यमातून अनेक मेहनती व अनुभवी पोलिस कर्मचाऱ्यांना अधिकारी होण्याची सुवर्णसंधी मिळत होती. मात्र, फेब्रुवारी २०२२ च्या शासन निर्णयानुसार, ही परीक्षा बंद करण्यात आली होती.

गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी याबाबत एप्रिलमध्ये मुख्यमंत्री फडणवीस यांना पत्र लिहून पोलिसउपनिरीक्षक पदासाठीची खात्यांतर्गत परीक्षा पुन्हा सुरू करण्याची मागणी केली होती. या विषयाचा सातत्याने केल्यामुळे पाठपुरावा शासनाने बुधवारी अधिकृत निर्णय घेतला आहे.

पोलिस कॉन्स्टेबलना त्यांच्या सेवाकालाच्या शेवटच्या बहतीद्वारे हे पद मिळते. अशावेळी त्यांना उपनिरीक्षक म्हणून दोन-तीन वर्षेच काम करता येते. मात्र, विभागीय परीक्षेतून उत्तीर्ण झालेल्यांना कमी वयातच हे पद मिळते आणि पुढील २० ते २५ वर्षे यापेक्षा वरिष्ठ पदांवर कार्य करण्याची संधी मिळू शकते. या निर्णयामुळे राज्यातील मेहनती, अनुभवी, तसेच तरुण पोलिस अंमलदारांसाठी पीएसआय पदाचा मार्ग पुन्हा खुला झाला आहे; अन्यथा त्यांना अनेक वर्षे प्रतीक्षा करावी लागली असती.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:31 PM 04/Sep/2025