Ganeshgule : श्वसनाचा त्रास जाणवू लागलेल्या प्रौढाचा मृत्यू

पावस : श्वसनाचा त्रास जाणवू लागलेल्या प्रौढाला उपचारासाठी पावस येथील खासगी रुग्णालयात दाखल केले होते. अधिक उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले असता तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. विद्याधर रामा नारकर (वय ५०, रा. आगरगुळेवाडी, गणेशगुळे, रत्नागिरी) असे मृत प्रौद्याचे नाव आहे. ही घटना सोमवारी (ता. १) सायंकाळी घडली. पूर्णगड सागरी सुरक्षा पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:39 AM 05/Sep/2025