Mandangad : कुणबी भवनात घुमला भक्तीचा जागर

मंडणगड : मंडणगड तालुका कुणबी सेवा संघाच्यावतीने कुणबी भवन सार्वजनिक गणेशोत्सवाच्या निमित्ताने आयोजित भजन सादरीकरण कार्यक्रमात भक्तीच्या जागरासाठी वैष्णवभक्तांचा मेळा अवतरला. या निमित्ताने नारदीय व वारकरी परंपरेशी बांधिलकी सांगणारी भजने सादर करण्यात आल्याने शहरातील वातावरण भक्तिमय बनून गेले.

संदीप किल्लेकर वाल्मिकीनगर, जय अंबे महिला भजनी मंडळ पाट, ज्ञानेश्वर माऊली भजन मंडळ ढांगर, शशिकांत पोस्टुरे व मंडळी, श्री. संतसेवा वारकरी सम्प्रदाय मंडणगड, दिनेश पोस्टुरे, योगेश पवार, सुरेश जाधव व मंडळी यांनी सुरेल व लयबद्ध भजने सादर केली. बाल मृदंगणी सुयोग पवार व बालगायक स्वराज किल्लेकर यांनी केलेले सादरीकरण हे या कार्यक्रमाचे विशेषण ठरले. सायकांळी संगीत संयोजक विश्वदास लोखंडे व सहकारी मंडळींचा लाइव्ह कराओके गीतगायनाचा कार्यक्रम झाला. कार्यक्रमासाठी भाई पोस्टुरे, विजय ऐनेकर, रघुनाथ पोस्टुरे, सचिन माळी, सुरेश पोस्टुरे, समाजबांधवांनी मेहनत घेतली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:52 PM 05/Sep/2025