Eid-e-Milad : खेड शहरात ईद-ए-मिलादनिमित्त भव्य मिरवणूक

खेड : प्रेषित महमद पैगंबर जयंतीनिमित्त ईद-ए-मिलादच्या पार्श्वभूमीवर शहरात शुक्रवारी मुस्लिम समाजाच्या वतीने भव्य मिरवणूक काढण्यात आली. यामध्ये शेकडो अनुयायांनी सहभाग घेतला. सजवलेल्या गाड्या शिस्तबद्ध शहरातून नेण्यात आल्या.

शहरातील मदिना चौक येथून सकाळी मिरवणुकीला सुरुवात झाली. पुढे ही मिरवणूक बसस्थानक मार्गे, वाणीपेठ, निवाचा चौक, गांधी चौक, पान गल्ली मार्गे सफा मशीद चौकात दाखल झाली. मिरवणूक संपूर्ण शहरातून शिस्तबद्ध पद्धतीने काढण्यात आली या मिरवणुकीत लहान मुले, तरुण आणि वृद्धांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.

पारंपरिक पोशाख, आकर्षक झेंडे आणि धार्मिक घोषणाबाजी यासोबत डीजेवर लावलेल्या गाण्यांमुळे मिरवणूक देखणी ठरली. अनेकांनी रस्त्याच्या दुतर्फा उभे राहून मिरवणुकीचे स्वागत केले. ईद-ए-मिलादनिमित्त मशिदींमध्ये दिवसभर अनेक धार्मिक कार्यक्रम, कुरआन तसेच पैगंबरांच्या पठण जीवनचरित्रावर आधारित व्याख्याने आयोजित करण्यात आली होती. यानिमित्ताने बंधुत्वाचा आणि सामाजिक ऐक्याचा संदेश देत खेड शहरात आजचा हा दिवस उत्साह, भक्तिभाव आणि आनंदमय वातावरणात साजरा करण्यात आला.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
*शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:03 AM 06-Sep-2025