Health camp: आरवलीतील समूदाय आरोग्य शिबिरात १५५ जणांनी घेतला लाभ

आरवली : ग्रामीण भागातील नागरिकांना त्यांच्या घराच्या जवळच आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने आरवली येथील सार्वजनिक गणेशोत्सवाच्या ठिकाणी ४ सप्टेंबर रोजी डॉ. शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली समूदाय आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. माखजन प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच उत्कर्ष तरुण मित्र मंडळ आरवली यांच्या माध्यमातून हे शिबिर आयोजित करण्यात आले होते.

या शिबिरात एकूण १५५ लाभार्थीनी सहभाग घेतला आणि विविध आरोग्य सेवांचा लाभ घेतला. या शिबिरात नागरिकांची रक्तदाब, साखर (शुगर) आणि रक्त तपासणी करण्यात आली. तसेच, शासनाच्या महत्त्वाकांक्षी आयुष्यमान कार्ड योजनेसाठी पात्र लाभार्थ्यांची नोंदणी करून त्यांना कार्ड काढून देण्यात आले. याव्यतिरिक्त, किरकोळ आजारांवर तातडीने उपचार आणि अधिक तपासणीसाठी संदर्भ सेवा (रेफरल सेवा) देखील पुरवण्यातआली. शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी अनेक आरोग्य कर्मचारी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.

यामध्ये समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. गणेश चाटे, नरहरी चाटे, सागर मुसळे आणि सुनील तिकोटी यांचा सहभाग होता. आरोग्य सेविका आंबवकर आणि शिंदे यांनीही महत्त्वपूर्ण योगदान दिले. सर्व आशासेविका, लॅब टेक्निशियन प्रियांका बने आणि स्थानिक महिला बचतगट आरवली यांनीही या शिबिरासाठी सक्रिय सहभाग घेतला. शिबिरासाठी दिनेश परकर, मंदार पिलणकर, अशोक केंडविलकर, जिग्नेश पटेल, चैतन्य परकर, संजय जाधव, विनायक सुर्वे, संतोष पेडणेकर, दत्तात्रय परकर, विक्रम परकर, सुदेश पवार, भरत भुवड, सुजल पिलणकर, मंगेश परकर यांनी प्रयत्न केले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
*शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:12 AM 06-Sep-2025