खेड : तालुक्यातील कुडोशी आंग्रेवाडी येथे २६ ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास झालेल्या कार अपघातात जखमी झालेल्या तरुणाचा उपचार घेत असताना मृत्यू झाला आहे. रविंद्र दाजी आंग्रे (५९, रा. कुडोशी, आंग्रेवाडी) हे आपल्या ताब्यातील व्हॅगनर कार (क्र. एम एच ४७ ए७४६४) घेऊन निष्काळजीपणे व वेगाने चालवत होते. या दरम्यान त्यांनी मागून येणाऱ्या वाहनांची खबरदारी न घेता समोरून येणाऱ्या मोटार सायकलला (क्र. एमएच ०८ एबी ६८५६) जोराची धडक दिली. या अपघातात मोटार सायकलस्वार संजोग दीपक शिंदे (रा. मोहाने, ता. खेड) गंभीर जखमी झाला होता. मात्र, उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. अपघातात दोन्ही वाहनांचेही मोठे नुकसान झाले आहे. या प्रकरणी खेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयित आरोपी कारचालक रविंद्र आंग्रे याच्याविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
*शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:21 AM 06-Sep-2025












