Agristack Yojana : अग्रीस्टॅक योजनेत शेतकरी नोंदणीसाठी ८ सप्टेंबरपासून ग्रामस्तरावर विशेष मोहीम

रत्नागिरी : जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आढावा बैठकीमध्ये सर्व शेतकऱ्यांनी अग्रीस्टॅक योजनेमध्ये नोंदणी करून फार्मर आयडी काढून घेण्याचे आवाहन करण्यात आले. याकरिता ८ सप्टेंबरपासून जिल्ह्यात ग्रामस्तरावर विशेष मोहिमेचे आयोजन करण्याच्या सूचना कृषी, महसूल व ग्रामविकास विभागांना दिल्या.

जिल्ह्यातील सर्व नोंदणी प्रलंबित असणाऱ्या शेतकऱ्यांनी आपल्या गावातील ग्राम महसूल अधिकारी, सहायक कृषि अधिकारी व ग्रामपंचायत अधिकारी याचेशी संपर्क साधून आपल्या गावात होणाऱ्या कॅम्पची माहिती घेऊन उपस्थित राहावे, आपला फार्मर आयडी काढून घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
*शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:28 AM 06-Sep-2025