खेड : तालुक्यातील गाव आवाशी भेंडेवाडीतील सामाजिक कार्यकर्ते संतोष खरात यांचे सुपुत्र आयुष खरात याची ऑल इंडिया महाराष्ट्र टेनिस क्रिकेट संघात निवड झाली आहे. सोलापूर जिल्ह्यातील अकुलज येथे आयोजित सातव्या अजिंक्यपद टेनिस क्रिकेट स्पर्धेत आयुष याने दमदार खेळाच्या जोरावर सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
त्याच्या उत्कृष्ट कामगिरीची दखल आयोजकांनी घेऊन त्याची थेट ऑल इंडिया महाराष्ट्र टेनिस क्रिकेट संघात निवड केली आहे. उत्तर प्रदेशातील मथुरा व्यथ होणा-या ऑल इंडिया महाराष्ट्र टेनिस क्रिकेट चॅम्पियनशिपमध्ये आयुष ऑल इंडिया महाराष्ट्र टेनिस क्रिकेट संघातून खेळणार आहे. रत्नागिरी महाराणी अहिल्यादेवी समाज प्रबोधन मंचतर्फे आयुषचा गौरव करण्यात आला आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
*शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:49 AM 06-Sep-2025












