Devrukh : तामनाळे रामेश्वर येथे २५ लाखांचा कॉजवे मंजूर

देवरुख : आमदार शेखर निकम यानी तामनाळे येथील स्वयंभू रामेश्वर मंदिराकडे जा-ये करण्यासाठी केला २५ लाखांचा कॉजवे मंजूर केला आहे. यामुळे नाल्यापलीकडील शेती करण्यास ग्रामस्थांना मिळणार असल्याने समाधान व्यक्त केले जात आहे.

मंदिरालगत एक मोठा नाला आहे. त्याचबरोबर या गावातील ५०% शेती ही या नाल्या पलिकडे आहे. ही अडचण लक्षात घेऊन या गावचे तत्कालीन सरपंच कै. तानाजी गिडये यांचे मागणीनुसार माजी आमदार कै.मामी भुवड यांचे प्रयत्नाने माजी बांधकाम मंत्री जगन्नाथ जाधव यानी लोखंडी फुट ब्रीज मंजूर केला. यामुळे या गावातील लोकांची मोठी समस्या दूर झाली आहे.

४० वर्षापूर्वी झालेला हा लोखंडी साकव गेली ५/६ वर्षे नादुरुस्त होता. गेली तीन वर्षे या साकवावर ग्रामस्थ श्रमदानातून लाकडी साकव टाकून ये जा करत होते. ही समस्या सोडविण्यासाठी हुमणे गुरूजी यानी गेली पाच वर्षे प्रयत्न केले. याला यश मिळत नव्हते. आमदार निकम यांच्या कार्यप्रणालीवर खुष होऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली दोनशे अडीचशे लोकांच्या साक्षीने हा कॉजवे तामनाळे येथील स्वयंभू रामेश्वर मंदिराकडे जाणारा ३०० मीटर अपूर्ण रस्ता व हा रस्ता डांबरीकरण या तीन कामाची मांगणी करून आमदार शेखर निकम यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी पक्षात जाहीर प्रवेश केला.

याचे औचित्य साधून मे महिन्यामध्ये झालेल्या हुमणे परिवार कुळदेवता प्रतिष्ठापना सोहळा या कार्यक्रमासाठी आमदार शेखर निकम याना निमंत्रित करण्यात आले होते. याच कार्यक्रमात हुमणे गुरूजी यांनी या तिन्ही कामाची पुन्हा मागणी केली. यावेळी आमदार निकम यानी ही तिन्ही कामे मंजूर करण्याचे आश्वासन दिले. गेल्या महिन्यात या तीन कामापैकी रामेश्वर मंदिर कॉजवे या कामाला आमदार निकम यानी २५ लाखांचा निधी मंजूर केला.

आमदार निकम यानी ही लोकांची समस्या दूर केल्याबद्दल हुमणे गुरूजी, माजी सरपंच संतोष हुमणे, चंद्रकांत गराटे, संतोष बडवे, अशोक धनावडे, स्थानिक मंडळाचे अध्यक्ष बाबाजी गिडये, सचिव सहदेव गिडये, उपाध्यक्ष धोंडू गिडये, कृष्णा गिडये, गजानन घाणेकर, संदीप धनावडे व गावप्रमुख रघुनाथ गिडये यांनी आमदार निकम यांचे अभिनंदन केले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
*शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:03 PM 06-Sep-2025