Mandangad : संरक्षण भिंत कोसळून पंधरा दिवस सीएनजी पुरवठा बंद

मंडणगड : मंडणगडमधील एचपीसीएल कंपनीचा नोबेल ऑटो पेट्रोल पंपाची संरक्षण भिंत कोसळल्याने पंप व्यवस्थापकाने पंपावरील सीएनजी गॅस चा पुरवठा किमान पंधरा दिवसांसाठी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ऐन गणेशोत्सवात सीएनजीचा पुरवठा बंद झाल्याने स्थानिक सीएनजी वाहनधारकांसह गणेशोत्सवासाठी आलेल्या गणेशभक्तांचे प्रचंड हाल झाले आहेत.

शहरातील पालवणी फाटा येथील नोबेल ऑटो पेट्रोल पंपाच्या कंपाऊंडसाठी घातलेली संरक्षण भिंत चार दिवसांपूर्वी पावसामुळे कोसळली. या संरक्षण भिंतीला लागुनच असलेला मोठा विद्युत जनरेटर व सीएनजी गॅस टाक्या आहेत. त्यामुळे संरक्षण भिंतीचे नव्याने बांधकाम करणे अपरिहार्य आहे. बांधकामाकडे दुर्लक्ष केल्यास पंपावरील उपकरणांचे नुकसान होऊ शकते. यासाठी पेट्रोल पंप व्यवस्थापकाने तातडीने नवीन काँक्रीटची संरक्षण भिंतीचे बांधकाम करण्याचे काम हाती घेतले आहे. सद्या हे काम प्रगतीपथावर संरक्षण भिंत बांधकाम पूर्ण होण्याकरिता दहा ते बारा दिवसांचा कालावधी लागणार असल्याने सीएनजीचा पुरवठा यादरम्यान बंद केल्याची माहिती पेट्रोल पंप व्यवस्थापक दानिश डीमटीमकरयांनी दिली.

दरम्यान, तालुक्यात एकमेव सीएनजीचा पंप असल्याने सीएनजी वाहनधारकांचे हाल होत असून त्यांना पर्याय म्हणून चाळीस किमी अंतरावरील खेड, दापोली, महाड, गोरेगाव येथील सीएनजी पंपावर जावे लागत आहे.तरी कंपनीने एचपीसीएल सीएनजीचा पुरवठा लवकरात लवकर सुरु करण्याची मागणी स्थानिक सीएनजी गॅस वाहनधारकांकडून केले जात आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
*शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:10 PM 06-Sep-2025