RDCC : जिल्हा बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी डॉ. सुधीर गिम्हवणेकर यांनी स्वीकारला पदभार

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजय चव्हाण हे निवृत्त झाल्यानंतर त्यांच्या जागी डॉ. सुधीर प्रभाकर गिम्हवणेकर यांना बढती मिळाली असून नुकताच त्यांनी पदभार स्वीकारला.

रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत विभागीय कार्यालय खेड येथे डॉ. गिम्हवणेकर हे २००३ रोजी व्यवस्थापक पदी नेमणूक झाली होती. २००३ ते ऑक्टोबर २००७पर्यंत डॉ. गिम्हवणेकर यांनी विभागीय कार्यालय खेड येथे कामकाज केले असून नोव्हेंबर २००७ ते ऑक्टोबर २०१३ कर्ज विभाग रत्नागिरी येथे कार्यभार सांभाळला. त्यानंतर जुलै २०१४ मध्ये बँकेच्या कर्ज विभाग प्रधान कार्यालय रत्नागिरी येथे सहा. सरव्यवस्थापक पदी पदोन्नती देण्यात आली. डॉ. गिम्हवणेकर यांनी सहा. सरव्यवस्थापक म्हणून बँकेचे प्रधान कार्यालय रत्नागिरी येथे तसेच क्षेत्रिय कार्यालय मंडणगड येथे सहा. सरव्यवस्थापक म्हणून कामकाज पाहिले आहे. त्यानंतर यांना नोव्हेंबर २०१८मध्ये उपसरव्यवस्थापकपदी, जून २०२१ मध्ये सरव्यवस्थापकपदी पदोन्नती मिळाली आहे. त्यानंतर जून २०२१पासून ते बँकेच्या प्रधान कार्यालय लेखा / क्षेत्र /माहिती तंत्रज्ञान या विभागाचे सरव्यवस्थापक म्हणून काम करीत आहेत. डॉ. गिम्हवणेकर यांनी १ सप्टेंबर रोजी बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा पदभार स्वीकारला असून त्यांना बँकेचे अध्यक्ष डॉ. तानाजीराव चोरगे व संचालक मंडळाने शुभेच्छा दिल्या.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
*शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:35 PM 06-Sep-2025