Ganesh Visarjan : पारंपारिक वाद्यासह नियोजनबद्ध डॉल्बी व डीजेमुक्त विसर्जन मिरवणूक करण्याचे आवाहन

रत्नागिरी : गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या जयघोषात आज (७ सप्टेंबर) अनंत चतुर्दशीला रत्नागिरी शहरातील ८ सार्वजनिक आणि सुमारे १२०० घरगुती बाप्पांचे विसर्जन होणार आहे. रत्नागिरी शहरातील मांडवी आणि भाट्ये समुद्रकिनारी विसर्जन होणार असून या ठिकाणी पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे.

८ अधिकारी व ९५ पोलीस अंमलदार या बंदोबस्तामध्ये उपस्थित असणार आहेत. पारंपरिक वाद्यासह नियोजनबद्ध डॉल्बी व डीजेमुक्त विसर्जन मिरवणूक करा, असे आवाहन पोलीस निरीक्षक विवेक पाटील यांनी केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
*शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
1:00 PM 06-Sep-2025