Sangameshwar : दहावीत शिकणाऱ्या विघ्नेशने वाचवले आपल्या पित्याचे प्राण

संगमेश्वर : शिवने येथे गणपती विसर्जन करीत असताना पाण्याचा अंदाज न आल्याने जोराच्या प्रवाहामुळे श्विनय प्रभाकर जाधव उर्फ बंड्या हे अचानक पाण्यात बुडले. चक्राकार प्रवाहामुळे त्यांना प्रयत्न करूनही स्वतःचा बचाव करता येत नव्हता. विसर्जनाच्या वेळी झालेल्या या घटनेने सर्वांचाच गोंधळ उडाला. हे सर्व त्यांचा मुलगा विघ्नेश हा स्वतः बघत होता. त्याला वाटत होते की आपले वडील त्या संकटातून सुखरूप बाहेर येतील. परंतू त्याच्या हे लक्षात आले की परीस्थीती बिकट आहे. आपल्या वडीलांचे प्राण धोक्यात आहेत हे लक्षात येता आपल्या वयाचा व वाढत्या पाण्याचा कसलाही विचार न करता पाण्यामध्ये उडी मारून आपल्या वडीलांचे प्राण वाचवण्यासाठी त्यांचा पर्यंत पोहचून पाण्यामध्ये वडीलांना उचलून घेतले. कु. विघ्नेशच्या या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

दादासाहेब सरफरे विद्यालयमध्ये इयत्ता १० वी मध्ये शिकत असणारा विघ्नेश हा विद्यार्थी वय वर्ष १५ परंतू त्याची ताकद व पाण्याचा प्रवाह त्याला साथ देत नव्हती. परंतु त्यांनी वडिलांना धरून ठेवले. हे जेव्हा संतोष शांताराम जाधव वय ५५ वर्ष यांना समजले तेव्हा त्यांनी पाण्यामध्ये उडी मारली. सोबत त्यांचा मुलगा मुलगा ओंकार यांने सुद्धा धोका पत्करून पाण्यामध्ये उडी मारून विनय उर्फ बंड्या याचे प्राण वाचवले. त्यांच्या या धाडसी कामगिरीचे बुरंबी पंचक्रोशीतून कौतुक होत आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
*शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
2:11 PM 06-Sep-2025