मंडणगड : वाळू उत्खनन व वाहतुकीस बंदी असताना विनापरवाना वाळू वाहतूक केल्याप्रकरणी मंडणगड तहसीलदार अक्षय ढाकणे आणि त्यांच्या पथकाने गुरुवारी रात्री तीन डंपरवर धडक कारवाई केली. ही कारवाई शुक्रवारी सायंकाळी उशिरापर्यंत सुरू होती.
शासनाच्या वाळू धोरणासंदर्भात कुठलीही स्पष्ट सूचना नसल्याने वाळू उत्खनन व वाहतुकीला बंदी आहे. मात्र गणेशोत्सवासाठीच्या शासकीय सुट्टीचा फायदा घेऊन मंडणगड तालुक्यातील सावित्री खाडी पात्रात अवैद्यरित्या वाळू उत्खनन सुरू आहे. शासकीय सुट्टया संपल्यानंतर प्रशासकीय अधिकारी कामाला लागले आणि त्यांनी विनापरवाना वाळू वाहतूक करणाऱ्या तीन डंपरवर कारवाई करत डंपर तहसील कार्यालयाच्या आवारात आणले
सध्या वाळूची उपलब्धता कमी असल्याने चोरट्या वाळूवाल्यांना चांगला दर मिळत आहे. त्यामुळे तपासणीमध्ये थोडी ढिलाई दिसली तरी लगेचच वाळू उत्खनन केले जात आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
*शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
2:59 PM 06-Sep-2025












