sangameshwar : कुरधुंडा ओढ्यावर पडून गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा मृत्यू

देवरुख : संगमेश्वर तालुक्यातील कुरधुंडा गाव रहाट येथील ओढ्यावर पडून गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा मृत्यू झाला आहे. प्रमोद प्रभाकर मेढेकर (४७ रा. नवी मुंबई) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.

प्रमोद मेढेकर आणि दीपक खडपेकर हे दोघे मित्र व नातेवाईक असून, दोघेही नवी मुंबई येथे राहतात. ४ सप्टेंबर रोजी सकाळी ६ वाजता सावंतवाडी-दिवा पॅसेंजरने गावी आले होते. वाटेत राहटघर येथील पाणी साठवणाऱ्या सिमेंट काँक्रिटच्या बंधाऱ्यावर ते थांबले.

त्यावेळी प्रमोदचा तोल जाऊन तो पाण्यात पडला व डोक्याला, उजव्या कानाजवळ गंभीर इजा झाली. रक्तस्राव होऊ लागला. दीपक आणि स्थानिक लोकांनी त्याला रुग्णालयात नेले. परंतु संगमेश्वर ग्रामीण रुग्णालयात त्याला मृत घोषित केले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:46 AM 08/Sep/2025