Chiplun : कळकवणेत वन खात्याकडून मगरीला जीवदान

चिपळूण : अतिवृष्टीने झालेल्या पुराच्या पाण्यातून मौजे कळकवणे येथील किरण शिंदे यांच्या नदीजवळील शेतातील शेततळ्यात मगर आढळून आली. यानंतर शिंदे यांनी या बाबतची माहिती वन विभागास दिली. यानंतर या ठिकाणी पिंजरा घेऊन वनरक्षक (कोळकेवाडी) कृष्णा इरमले, वनरक्षक (फिरते पथक) दत्ताराम सुर्वे, वाहन चालक नंदकुमार कदम, घटनास्थळी धाव घेतली. यानंतर शेततळ्यामधील पाणी मोटरच्या साहाय्याने कमी करण्यात आले व मगरीला सुरक्षितरित्या पकडून तिला अधिवासात सोडण्यात आले.

ही मगर साडेतीन ते चार फुटांची आहे. सदरचे बचाव कार्य विभागीय वन अधिकारी रत्नागिरी (चिपळूण) सौ. गिरीजा देसाई, सहाय्यक वनसंरक्षक प्रियंका लगड, वनपरीक्षेत्र अधिकारी (चिपळूण) श्री. खान, वनपाल चिपळूण श्री. सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:50 AM 08/Sep/2025