मंडणगड : भिंगळोली येथील पोलिस वसाहतीचे गणेश मुर्ती विसर्जनाचे मिरवणुकीने ७ सप्टेंबर २०२५ रोजी तालुक्याचे गणेशोत्सवाची सांगता करण्यात आली. तत्पूर्वी अनंत चतुदर्शीला बाणकोट पोलीस ठाण्याच्या हद्दीत २ सार्वजनिक तसेच अनेक खाजगी, मंडणगड पोलिस ठाण्याच्या हद्दीत ३ सार्वजनीक व अनेक खाजगी गणेशमूर्तीचे शांततेत व भक्तीपूर्ण वातवरणात विसर्जन करण्यात आले.
मंडणगड तालुका कुणबी समाज सेवा संघाचे गणेशमूर्तीचे २१ किलोमीटर लांबीच्या विसर्जन मिरवणुकीस सकाळी दहा वाजता सुरुवात करण्यात आली. डिजे व पांरपरिक खालु बाजूचे तालावर आयोजीत करण्यात आलेल्या या मिरवणुकीत तालुक्यातील कुणबी समाज बांधव व गणेशभक्त मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. चिंचघर येथे भारजा नदी मध्ये गणरायाचे मोठ्या भक्तिभावाने विसर्जन करण्यात आले.
पालघर येथील सार्वजनीक गणेशोत्सव मंडळाच्या गणेश मुर्तीचे भारजा नदीत विसर्जन करण्यात आले तर म्हाप्रळ येथील नवतरुण सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या मुर्तीचे सावित्री नदीत विसर्जन करण्यात आले. मिरवणुकीचे कार्यक्रम शांततेत संपन्न व्हावेत याकरिता मंडणगड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नितीन गवारे व बाणकोट सागरी पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय चव्हाण, तालुका होमगार्ड समादेशक प्रदीप मर्चडे याच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तालुक्यातील पालघरवाडी गणेशोत्सव मंडळाने यंदाही जिल्हा व राज्यस्तरावरी स्पर्धेत सहभागी होऊन पारितोषीके मिळवली.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:06 AM 08/Sep/2025














