Ratnagiri : महामार्गावरील अवजड वाहतूक आजपासून पूर्ववत

रत्नागिरी : गणेशोत्सव कालावधीत महामार्गावर अवजड वाहनांमुळे होणारी वाहतूककोंडी टाळण्यासाठी २३ ऑगस्टपासून अवजड वाहतूक थांबविण्यात आली होती. ती आज, दि. ८ सप्टेंबर रोजी रात्री ८ वाजल्यापासून पूर्ववत होणार आहे.

रखडलेल्या चौपदरीकरणासह महामार्गावरून धावणाऱ्या अवजड वाहनांमुळे गणेशोत्सवादरम्यान वाहतूककोंडीचा प्रश्न निर्माण होतो. अवजड वाहनांमुळे होणाऱ्या वाहतूककोंडीतून गणेशभक्तांची वाहने मार्गस्थ करताना महामार्गावर तैनात पोलीस यंत्रणेची दमछाक होते. या पार्श्वभूमीवर २३ ऑगस्टपासून महामार्गावर अवजड वाहतुकीला बंदी घालण्यात आली होती. गणरायाला निरोप दिल्यानंतर गणेशभक्त परतीला निघाले. यामुळे महामार्ग वाहनांच्या वर्दळीने पुरता गजबजला आहे. मात्र आजपासून ती कमी होईल. त्यानंतर रोखण्यात आलेली अवजड वाहतूक पूर्ववत होणार आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:15 08-09-2025