Sangameshwar : कोंडीवरेत पैगंबर महंमद यांच्या जन्मदिवसानिमित्त मिरवणूक

सावर्डे : पैगंबर महंमद यांच्या १५०० व्या जन्मदिवसानिमित्त कोंडीवरे (ता. संगमेश्वर) येथे मिरवणूक काढण्यात आली. दारूल उलुम या मदरसामधून काढण्यात आलेल्या मिरवणुकीत मौलवी, विद्यार्थ्यांसह, तरुण, ग्रामस्थ सहभागी झाले. रत्नागिरी जिल्ह्यात ईद-ए-मिलादनिमित्त ठिकठिकाणी मिरवणुका निघतात. कोंडीवरे येथे दरवर्षी मिरवणूक काढून हा दिवस साजरा करण्यात येतो.

कोंडिवरे व परिसरातील मशिदींमध्ये पैगंबर महंमद यांच्या जीवनचरित्रावर मौलवींनी मनोगत व्यक्त करून पैगंबरांच्या शिकवणीचे आचरण करण्याचे आवाहन केले. या वेळी विधिवत प्रार्थना करून विश्वशांतीसाठी दुआ करण्यात आली. यानंतर भव्य मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीत पैगंबर महंमद यांच्या स्मरणार्थ आणि त्यांचे जयघोष करणाऱ्या घोषणा देण्यात आल्या. मिरवणुकीत शांततेचे संदेश देणारे फलक फडकवण्यात आले. या वेळी नाअत, सलाम आणि दुआ करण्यात आला. या मिरवणुकीत उल्लेमांसह तरुण, ग्रामस्थ सहभागी झाले होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:41 AM 08/Sep/2025