chiplun : घरगुती गणेश सजावट स्पर्धेत नारळापासूनच्या सजावटीस प्रथम क्रमांकांचे बक्षीस

चिपळूण : गणेशोत्सवामध्ये आपल्याला दरवर्षी वेगवेगळ्या प्रकारचे देखावे पाहावयास मिळतात. त्यातून काही ठिकाणी घरगुती गणेश सजावट स्पर्धांचे आयोजन केले जाते. बामणोली येथे आयोजित केलेल्या स्पर्धेमध्ये नवजवान मित्रमंडळ किजबिलेवाडी येथील बंधुप्रेम या नावाने परिचित असलेला चांदिवडे परिवार यांनी नारळापासून केलेल्या पर्यावरणपूरक सजावटीला प्रथम क्रमांक प्राप्त झाला आहे.

मुंबई क्रीडा मंडळ बामणोली यांच्यावतीने घरगुती गणेशोत्सव सजावट स्पर्धा दरवर्षी आयोजित केली जाते. यावर्षी बंधुत्वाचा बाप्पा चांदिवडे परिवार यांनी नारळापासून देखावा साकारला. कोकणात नारळाला कल्पवृक्ष संबोधले जाते. याच कल्पवृक्षाच्या माध्यमातून अतिशय सुरेख कलाकृती साकारली होती. नारळाच्या झाडाचा प्रत्येक भागाचा उपयोग या मखर सजावटीसाठी केला होता. या सजावटीमध्ये त्यांनी करवंटी, झाप, सुंब, नारळ या सर्वांचा वापर केला होता. त्यांच्या कलाकृतीला प्रथम क्रमांक देण्यात आला. निवड समितीने पर्यावरणपूरक देखावा म्हणून कौतुक केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:01 PM 08/Sep/2025