Ratnagiri : पादचारी वृद्धाला धडक; अज्ञात स्वाराविरुद्ध गुन्हा

रत्नागिरी : तालुक्यातील दांडेआडोम-भावेआडोमवरून कोतवडे जाणाऱ्या रस्त्यावर पादचाऱ्याला ठोकर देऊन जखमी अवस्थेत टाकून पलायन करणाऱ्या अज्ञात स्वाराविरुद्ध ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना शुक्रवारी (ता. ५) सायंकाळी दांडेआडोम ते कोतवडे जाणाऱ्या रस्त्यावर भावेआडोमपासून २०० किलोमीटर अंतरावर घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी रवींद्र कृष्णा मोरे (वय ४५, रा. दांडेआडोम-मांडवकरवाडी, रत्नागिरी) यांचे वृद्ध वडील श्रीकृष्ण सोनू मोरे (वय ६५) हे दांडेआडोम ते कोतवडे जाणाऱ्या रस्त्याने शेतावर जात असताना ग्रुपग्रामपंचायत दांडेआडोम-भावेआडोमपासून दोनशे मीटर अंतरावर कोतवडे दिशेने जाणाऱ्या स्वाराने त्यांना धडक दिली व पलायन केले.

त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. या प्रकरणी रवींद्र मोरे यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:07 PM 08/Sep/2025