संगमेश्वर : अल्पसंख्याक मुस्लिम समाजातील कार्यकर्त्यांनी शासनाच्या विविध कल्याणकारी योजना तळागाळात पोहचवून राष्ट्रवादी काँग्रेस संघटना बळकट करण्यासाठी हातभार लावावा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक सेलचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष जाकीर शेकासन यांनी केले.
संगमेश्वर तालुका देवरुख विभाग अल्पसंख्याक समाज प्रमुख कार्यकर्त्यांशी देवरुख येथील राष्ट्रवादी काँग्रेस (अजितदादा पवार) पक्ष कार्यालयात संवाद साधताना ते बोलत होते.
शेकासन पुढे म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष, राज्याचे उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार अल्पसंख्यांक समाजातील लोकांसाठी कल्याणकारी योजना राबवत आहेत. तसेच अल्पसंख्याक समाजाच्या हिताचे निर्णय घेत असून अल्पसंख्यांक समाजावर अन्याय होऊ नये यासाठी सतत प्रयत्न करीत आहेत. अल्पसंख्याक विभाग राज्य अध्यक्ष आमदार ईद्रीसभाई नायकवडी अल्पसंख्यांक समाजाच्या विकासासाठी ना. अजितदादा पवार यांच्याकडे सतत पाठपुरावा करीत असल्यानेच अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांसाठी ‘मार्टी’ सारखी योजना अमलात आली. या योजनेतर्गत अल्पसंख्यांक समाजातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी तसेच प्रशिक्षणासाठी मोठी मदत होणार आहे, असे शेकासन यांनी सांगितले.
यावेळी संगमेश्वर तालुक्यातील अल्पसंख्यांक सेलच्या पदाधिकारी, सदस्य तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हनीफ हरचिकर, मुखतार तांबू, अशफाक जेठी, बाबामिया जेठी, अल्पसंख्यांक सेल संगमेश्वर तालुका महिला अध्यक्षा सविहा नेवरेकर, तबस्सुम खांचे, आदी उपस्थित होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:19 PM 08/Sep/2025














