दापोली : छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानातंर्गत राष्ट्रनेता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्मदिन १७सप्टेंबर ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती २ ऑक्टोबर या कालावधीमध्ये दापोली तालुक्यामध्ये सेवा पंधरवडा साजरा करण्यात येणार तालुक्यातील सर्व नागरिकांनी सेवा पंधरवडा अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांत सहभागी व्हावे, असे आवाहन तहसीलदार दापोली अर्चना बोंबे यांनी केले आहे.
अभियान तीन टप्प्यामध्ये राबविण्यात येणार आहे. पहिला टप्पा- पाणंद रस्तेविषयक मोहीम १७ सप्टेंबर ते २२ सप्टेंबरदरम्यान राबविण्यात येणार आहे. ग्रामीण भागातील ग्रामीण रस्ते, हद्दीचे ग्रामीण रस्ते, ग्रामीण गाडी मार्ग, पाय मार्ग, शेतावर जाण्याचे पायमार्ग व गाडी मार्ग, शेत पांदण रस्त्यांचे अभिलेख अद्यावत करणे, त्यावर असलेले अतिक्रमण हटवणे व या रस्त्यांना विशिष्ट क्रमांक देणे याबाबतची कार्यपद्धती निश्चित करण्यात आलेली आहे. या कामकाजासाठी तालुकास्तरीय समिती गठीत करण्यात आलेली आहे. याचप्रमाणे ग्रामस्तरीय समिती (मंडळ अधिकारी, ग्रामविकास अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी, पोलीस पाटील, महसूल सेवक) स्थापन करण्यात आली असून ८ सप्टेंबर ते ९ सप्टेंबर रोजी ग्रामस्तरावर शिवार फेरीचे आयोजन केले आहे. या कालावधीत शेतरस्ते मिळण्याबाबत, रस्त्यांबाबत तक्रारी / अतिक्रमण बाबत जास्तीत जास्त अर्ज समितीकडे सादर करावे, असे आवाहन करण्यात येत आहे. त्यानंतर या समिती रस्त्यांची यादी करून विशेष ग्रासमसभेमध्ये मान्यता घेण्यात येणार आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:50 PM 08/Sep/2025












