Ratnagiri : रत्नागिरी उत्पादन शुल्क विभागाकडून ऑगस्टमध्ये ६ लाख ८ हजारांचा मुद्देमाल जप्त, ६ गुन्हे दाखल

रत्नागिरी : राज्य उत्पादन शुल्क निरीक्षक रत्नागिरी विभाग व भरारी पथक रत्नागिरी यांच्या पथकाने गेल्या महिन्यात धडक कारवाई करत गोवा राज्यातील विदेशी मद्यावर एकूण सहा गुन्हे दाखल केले. यामध्ये ६ लाख ८ हजार ११० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असल्याची माहिती पथकाने दिली.

गेल्या महिन्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाने कारवाई अधिक गतीमान केली होती. पेडणे अगस्ट व आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गोवा बनावट विदेशी मद्यावर धडक कारवाई सुरू होती. यासाठी महामार्गावर विविध ठिकाणी पथके कार्यरत होती.

राजापूर तालुक्यातील नाटे, पाचल व राजापूर शहरासह विविध भागात या कारवाया झाल्या. या कारवाईत एकूण सहा गुन्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात विदेशी दारू जप्त करण्यात आली.

या मोहिमेत कोल्हापूर विभागाचे उपआयुक्त विजय चिचाळकर, रत्नागिरी विभागाचे अधीक्षक कीर्तीस रेडोगे यांच्या मार्गदर्शनाखाली रत्नागिरी निरीक्षक आर. जी. मोरे, भरारी पथक निरीक्षक ए. ए. पाटळकर, दुय्यम निरीक्षक एस. ए. जाधव, जी. सी. जाधव, जवान एन. एन. सुर्ये, एन. जे. तुपे, सागर उबाळे, रोहित लोंढे, मलीक धोत्रे आदींनी ही कारवाई केली.

परिणामी, उत्पादन शुल्क विभागाच्या या धडक मोहिमेमुळे विदेशी मद्याच्या तस्करीला मोठा अडथळा निर्माण झाला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:59 PM 08/Sep/2025