चिपळूण : तालुक्यातील मांडकी-घाणेकरवाडी येथील एका घरातून तब्बल पावणेचार लाख रुपयांचे सोन्याचे दागिने चोरट्याने चोरून नेले. ही घटना दि. ५ सप्टेंबर रोजी सकाळी उघडकीला आली. याप्रकरणी रूपेश तानाजी घाणेकर (वय ३१, सध्या रा. घाटकोपर, मूळ रा. मांडकी घाणेकरवाडी) यांनी फिर्याद दिली आहे.
त्यानुसार, रूपेश घाणेकर हे गणेशोत्सवानिमित्त पत्नी, आई-वडील व भाऊ यांच्यासह मांडकी घाणेकरवाडी येथे आले होते. त्यांनी आपल्याकडील १५ तोळे ५ ग्रॅम ४०० मिली वजनाचे सोन्याचे दागिने बॉक्समध्ये भरून घरातील लोखंडी कपाटात ठेवले होते. मात्र, चोरट्याने हे दागिने चोरुन नेले आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:15 PM 08/Sep/2025












